Saturday, August 15, 2009

आभिषेक

आभिषेक .. सहा ते सात वर्षाचा typical ABCD मुलगा. माझ्या (दुरच्या) काकाच्या म्हणजे राजेशच्या दोन आपत्यांपैकी हा एक. दुसरी त्याची बहिण ऎश्वर्या. ती जवळपास बारा/तेरा वर्षींची आहे. माझ्या या काकाला "काका " म्हणणं त्याला आणी तसं मलाही अवडत नाही. फक्त काही वर्षांचाच फरक आमच्या मध्द्ये. लवकर लग्न झाल्यामुळे मुलेही लवकरच झाली. सुमारे वर्षभरापुर्वी आम्ही colleagues होतो. त्यामुळे नावानेच बोलणं होतं त्याच्याशी आणी त्याच्या बायकोशी. तर.. असो.

राजेशला अमेरिकेत येऊन झाली असतील पंधरा एक वर्षे. cupertino मध्ये छान टुमदार घंर आहे. मी काही वर्षापुर्वी CA ला shift झाल्यावर पहिल्यांदा त्याच्या घरी गेलो . तेंव्हा पहिल्यांदाच अभिषेक आणी ऎश्वर्याला भेटलो.

ऎश्वर्या शांत आहे. typical american teenager .. totally confused.. पण अभिषेक एकदम बडबड्या. बरेच वर्षं लहान मुलांशी काहीही दुरदुर पर्यंत संबंध नसल्या कारणाने पहिली भेट अतिशय विचित्र होती. मला एकदम साक्षात्कार झाला की मला लहान मुलांशी काय आणी कसं बोलायंच असतं ते बिल्कुत येत नाही. त्याचे असंख्य प्रश्न !! आणी मला त्याच्या वयाला अनुसरून काय ऊत्तरं द्यावी काही कळंत नाही.. त्यामुळे माझी विकेट ऊडते, हे दिपालीला (राजेशची बायको) कळत असल्याने ती नेहेमी मदतीला येते.

एकदा मी त्याच्या घरी गेलो तेव्हा अभिषेक हातात क्रिकेटची bat घेऊन आपल्या बाबाशी काहीतरी बोलत होता.
मी : (कुतुहलाने ) : काय अभिषेक नवीन bat दिसतेय.
अभिषेक : हो न दादा/काका . (त्याला मला काका म्हणावं की दादा हा नेहेमी प्रश्न पडतो. कारण त्याच्या
घरी येणारे त्याच्या बाबाबरोबरचे सगळे लोक त्याचे "काका"च असतात .. ) आजोबांनी
पाठवली.
मी : मग तुला काय आवडते , batting ki balling ? (अतिशय मुर्खासारखा प्रश्न.
पण काय करणार काही तरी बोलायला तर पाहिजे ना.. !! )
अभिषेक : अरे मला balling येत नाही. शिकवशील का. ?
मी : शिकवेन की.

मग माझा त्याला balling बद्दल सांगण्याचा प्रयत्न. पण एक दोन मिनीटातच मला कळलं की मला ते सुध्दा ठीक जमत नाहीये कारण तो अधिच confused झाल्या सारखा वाटला. माझा बोलताना नेहेमी एक गोंधळ होतो की त्याच्याशी "विंग्रजी" मध्ये बोलु की मराठी मध्ये ? कारण त्याला काही काही मराठी शब्द कळत नाहीत. आणी मला ते explain करता येत नाहीत .. :-)

त्या दिवशी त्याला जवळच त्याच्या काही मित्रांच्या घरी खेळायला जायचे होते. राजेश काही तरी करत होता मग मी म्हटलं "चल मी सोडवतो तुला" .. त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या कार मध्ये कोणी लहान बसलं. मी रेडिओ लावला तर तो म्हणे "मला रेडिओ आवडत नाही .. दादा अरे बंद कर ना" .. bay area Wild 94.9FM वर लहान मुलांचे कार्यक्रम लागत नाहीत हे मी तरी कसं काय विसरतो हे मला सुध्दा कळंत नाही. :-)

गेल्या वर्षी माझ्या पेशवे प्रेमामुळे भारतात गेल्यावर भिकबाळी घालुन आलो होतो. राजेश कडे गेलो तेव्हा अभिषेक चा पहिला प्रश्न : " अरे दादा हे कानात मुली सारखं काय घातलंय.. " ..
मी : " अरे याला भिकबाळी म्हणतात. पेशव्यांपासुन रामशास्त्री प्रभुणे, लोकमान्य टिळक आशा great लोकांनी घातली होती. मला आवडते म्हणुन घातली मी सुध्दा. भिकबाळी पुर्वी काशीला जाऊन studies केल्या शिवाय घालंत नसत.. "
अभिषेक : चेहऱ्यावर खुप मोठे प्रश्नचिन्ह !! आज "दादा असं काय बोलतोय " वगैरे आविर्भाव...
" हे प्रभुणे कोण रे .. ?"
मी : माझी परत विकेट ऊडालेली.. "अरे रामशास्त्री प्रभुणे खुप मोठे न्यायाधिष म्हणजे Judicial system मधले Judge होते. "

त्याचे पुढचे प्रश्नांचं bombardment सुरु होण्यापुर्वी राजेश माझ्यामदती साठी आला.
अभिषेक : " अरे दादा ते सगळं old झालं .. अमेरीकेत कोणी नाही वापरंत. that looks wierd .. "

निरागसतेत किती सामर्थ्य असतं हे मला त्या दिवशी कळालं.. माझं पेशवेप्रेम, मराठी चा अभिमान आशी अनेक भिकबाळीची कारणं त्याच्या एका वाक्यांत विरघळुन गेली. त्याला नसेल कळंलं पण "when in rome do as the romans do " ऎवढीं साधी गोष्टं त्याने मला नकळंतच सांगुन टाकली.

अभिषेक हा पहिला मुलगा असेल ज्याने मला माझ्या eventual fatherhood ची ऒळंख करून दिली. भविष्यात कधी ना कधी तरी मला ही असे असंख्य प्रश्नांना तोंड द्यावे लागणार आहे त्यामुळे हे लक्षात ठेवणं गरजेचं वाटलं...

3 comments:

Mahendra said...

Very Good Post... Mast aahe ekadam..

Deep said...

hahahaha sahi aahe ha anubhv! "The Return of the King" vaachle aani mag rahaavlech naahi aata porrna blog vaachto :D :D

Deep said...

hahahaha sahi aahe ha anubhv! "The Return of the King" vaachle aani mag rahaavlech naahi aata porrna blog vaachto :D :D